![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२२ जून । सलमान मुल्ला ।
विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मतदानानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट-रिचेबल झाले. त्यांना कॉल केला असता गुजराती भाषेतील ट्यून ऐकू आली. त्यावरुन ते गुजरात, सूरतमध्ये गेल्याची माहिती मिळाली.
एकनाथ शिंदे यांच्या सोबत 35 ते 40 आमदार असण्याची फोटो सोशल मीडियावर आणि वृत्तवाहिनी मध्ये दिसताच राज्यात नवीन सरकार येणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
त्यामुळं नेटकऱ्यांनी शक्कल लढवत विविध मिम्स बनविले आहेत. नवीन भाजपाचे सरकार येणार असल्यामुळं एक नेटकऱ्याने “राज्यपाल तातडीने झोपायला निघाले… उद्या सकाळी बहुतेक पहाटे लवकर शपथविधीसाठी उठावे लागणार वाटतंय” तर दुसरीकडे धर्मवीर चित्रपटातील एक संवाद व्हायरल होत आहे. “एकनाथ कुठे हाय…असं धर्मवीर आनंद दिघे विचारतायेत…आणि थोड्या वेळाने एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर दाखविले आहे” असे अनेक आज दिवसभर मिम्स सोशल मीडियावर फिरत आहेत. यावेळी नेटकरी अधिक शक्कल लढवत विविध मिम्स बनवत आहेत.

तर एकनाथ शिंदे सोबत साहेब जिल्ह्यातील दोन आमदार देखील पाहायला मिळाल्याने सर्वच पक्षाचे कार्यकर्ते व पुढारी एकमेकांविरोधात मीन्स जोक्स आणि निष्ठा शिकवताना दिसून आले.
तर उस्मानाबाद जिल्ह्यातील नेते व त्यांचे कार्यकर्ते एकमेकांना खरा निष्ठावंत कोण असे विचारत होते..
त्यामुळे उस्मानाबाद जिल्हावासीयांसह संपूर्ण महाराष्ट्र आणि मनोरंजनाने निखळून गेला होता..
