![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ जून । आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी मोबाईल टॉयलेट बरोबर आता मोबाईल हँड वॉश बेसिन देखील उलब्ध करुन देण्यात आली आहेत. वारकऱ्यांनी उघड्यावर शौचास जाऊ नये म्हणुन, शासन काही खासगी संस्थांच्या माध्यमातून वारीत मोठ्या प्रमाणात मोबाइल टॉयलेट उपलब्ध करून देते. मात्र मोबाईल टॉयलेटचा वापरल्या केल्यानंतर, त्या ठिकाणी हॅण्ड वॉश बेसिन आणि हात धुण्याच साबण उपलब्ध नसल्याने वारकऱ्यांना आपलं हात देखील स्वच्छ धुता येत नव्हत. त्यामुळे वारकऱ्यांना वारी दरम्यान काही आजारांच संसर्ग देखिल होत होत. नेमक हा जंतू संसर्ग टाळण्यासाठी जी आय एस ग्रूपने आषाढी वारी दरम्यान वारी मार्गावर जागोजागी मोबाईल हँड वॉश बेसिन आणि हात धुण्याच साबण उपलब्ध करून दिल आहे. कोरोना सारख्या जीवघेण्या साथीमुळे वारकऱ्यांना जंतू संसर्ग होण्याची शक्यता अजूनच वाढलीं आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी जी आय एस ग्रुपने वारी मार्गावर जवळपास दोन हजार मोबाईल टॉयलेट्स उपलब्ध करून दिले आहेत. त्यापैकी प्रत्येक 20 मोबाईल टॉयलेट जवळ दोन हँड वॉश बेसिन आणि त्या वॉश बेसिन मध्ये हात धुण्याच साबण देखिल उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आषाढी वारी खऱ्या अर्थानं निर्मल करण्यासाठी पुण्यातील जी आय एस ग्रुपने हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.
वारीत सहभागी होणारे जास्तीत जास्त वारकरी हे प्रामुख्याने राज्यातील ग्रामीण आणि निम शहरी भागातले आहेत. अशा वारकऱ्यांना हात कशाप्रकारे स्वच्छ धुवावे यासाठी मार्गदर्शन देखील जीआयएस ग्रुप करत आहेत. त्याचबरोबर वारकऱ्यांनी मोबाईल शौचालय वापर केल्यानंतर त्यांना मोफत हॅण्ड वाश लिक्वीड देखील जी आय एस ग्रुप वितरीत करत आहे
माझी वारी, निर्मल वारी करण्यासाठी शासन दरवर्षी विविध स्तरावर वेगवेगळे उपक्रम राबवित असते. त्या उपक्रमात शारिरीक स्वच्छ्ता देखिल योग्य प्रकारे राखली जावी यासाठी जी आय एस ग्रुप, वारी मोबाईल – वॉश बेसिन हा उपक्रम राबवत आहे.