CBSE Results 2022: सीबीएसई 10वी 12वी चा निकाल लवकरच जाहीर होणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ जून । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (CBSE) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल (10th 12th Results) लवकरच जाहीर होणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, दहावी आणि बारावीचा निकाल या महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात बोर्डाकडून जाहीर केला जाऊ शकतो. सीबीएसई परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर करणार आहे. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांना सीबीएसई cbse.gov.in अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला निकाल पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेशपत्राची गरज भासणार आहे. प्रवेशपत्रात (Admit Card) दिलेल्या रोल नंबर आणि जन्मतारखेच्या मदतीने ते आपला निकाल पाहू शकतील.

या आठवड्याच्या अखेरीस गुण अपलोड करण्याचे काम पूर्ण होऊन पुढील आठवड्यात दहावी, बारावीचे निकाल कधीही बोर्डाकडून जाहीर होतील,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांचा कल पाहिला तर सीबीएसईकडून दहावीचा निकाल प्रथम जाहीर होत आहे. अशा परिस्थितीत यंदाही दहावीचा निकाल आधी बोर्डाकडून जाहीर होऊ शकतो. त्याचबरोबर त्यांनंतर एक ते दोन दिवसांनी बारावीचा निकालही जाहीर होऊ शकतो. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा 26 एप्रिल 2022 पासून सुरू झाल्या. दहावीची परीक्षा 24 मे 2022 पर्यंत घेण्यात आली होती. बारावीची परीक्षा 15 जून 2022 पर्यंत घेण्यात आली होती. यंदा सुमारे 35 लाख विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीची परीक्षा दिली होती.

कसा पाहणार निकाल
विद्यार्थ्यांनी प्रथम सीबीएसई www.cbse.gov.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
यानंतर होम पेजवर दिलेल्या “सीबीएसई दहावी बारावी निकाल 2022” या लिंकवर क्लिक करा.
आता आपला रोल नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
तुम्ही तुमचा निकाल भविष्यासाठी डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून ती तुमच्याकडे ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *