सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी ! खाद्यतेल लीटरमागे 20 ते 25 रुपयांची घसरण

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२४ जून । खाद्यतेलाच्या (edible oil) दरात घसरण पहायला मिळत आहे. भविष्यात तेलाचे दर आणखी स्वस्त होऊ शकतात असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे . गेल्या काही महिन्यांपासून रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) युद्धामुळे गगनाला भिडलेल्या खाद्यतेलाच्या दरातील घसरणीमुळे नागरिकांना दिलासा मिळला आहे. केंद्र सरकारने खाद्यतेलावरील सीमा शुल्क दोन वर्षांसाठी हटविल्याने तेलाचे दर नियंत्रणात आले आहेत. मागील काही दिवसांत सोयाबीन आणि पामतेलाचे दर 10 ते 15 टक्क्यांनी कमी झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना वाढत असलेल्या माहागाईमध्ये थोडा का होत नाही दिलासा मिळाला आहे. रशिया आणि युक्रेमध्येमध्ये युद्ध सुरू आहे. आपण युक्रेनकडून मोठ्याप्रमाणात सुर्यफूलाच्या तेलाची आयात करतो. मात्र युद्धामुळे ही आयात ठप्प झाली आहे. तसेच इंडोनेशियाकडून काही काळ पाम तेलाच्या निर्यातीवर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र आता हे निर्बंध देखील उठवण्यात आले आहेत.

देशात महागाई वाढत आहे. वाढत्या महागाईचा मोठा फटका हा सर्वसामान्य लोकांना बसत आहे. इंधनापासून ते खाद्यतेलापर्यंत आणि अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत सर्वच वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये खाद्यतेलाचे दर चांगलेच कडाडले होते. खाद्यतेलाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने दोन वर्षांसाठी खाद्यतेलावरील सीमा शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होत नाहीत मात्र तेलाचे दर कमी झाले आहेत. दुसरीकडे इंडोनेशियाने पुन्हा एकदा पाम तेलाची निर्यात सुरू केल्याने भारतात असलेला खाद्यतेलाचा तुटवडा कमी होण्यास मदत मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *