महाराष्ट्रात यायला आम्ही थोडीच घाबरतो; एकनाथ शिंदेंचं गुवाहाटीतून शरद पवारांना प्रत्युत्तर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२५ जून । विधानमंडळाच्या नियमानुसार ज्या बाबी करायच्या त्या कराव्याच लागतील. त्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. महाराष्ट्रात यायला आम्ही थोडीच घाबरतो, अशा शब्दांत शिवसेना नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे.

पवार हे देशातील मोठे नेते आहेत. त्यांचा आम्ही आदरच करतो, पण, लोकशाहीत संख्याबळ महत्त्वाचे असते. कायद्यानुसार जे काही असते तसेच करावे लागते. नियमाप्रमाणे आमची बाजू भक्कम आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. सध्या आमच्याकडे ४०पेक्षा जास्त आमदार आहेत तर दहा अपक्षांचाही पाठिंबा आहे. आमदारांच्या बैठकीनंतर आम्ही पुढील गोष्टी ठरवू, असं शिंदे म्हणाले.

सर्व तांत्रिक आणि कायदेशीर बाबी आता पूर्ण झाल्या आहेत. आमदारांच्या बैठकीनंतर निर्णय घेऊ, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. शिवसेनेकडून आमदारांच्या निलंबनाची मागणी केली जात आहे. अल्पमतात असलेल्या गटाला असे निर्णय घेता येत नाहीत. याशिवाय, बैठकीला अनुपस्थित राहिल्याने आमदारकी रद्द केली तर ती देशातील पहिली घटना ठरेल.

महाशक्ती कोणती?

बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची महाशक्ती आपल्या पाठीमागे असल्याचा खुलासा त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *