महाराष्ट्राचं सत्ताकारण वेगळ्या वळणावर ? एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना दुसऱ्यांदा फोन ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२७ जून । एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिंदे गटाची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरीही अद्याप पुढचा रस्ता स्पष्ट झालेला नाही. भाजपची याला फूस असल्याचा बातम्या समोर येत आहेत. त्यातच फडणवीस यांचं दिल्लीतील नेत्यांसोबत बैठक सत्र वाढलं आहे. (Eknath Shinde Calls Raj Thackeray)

महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्यास भाजपकडून सत्तास्थापनेसाठी तयारी सुरू आहे. मात्र, घटनात्मक बाबी अद्याप पेंडिंग आहेत. याशिवाय बंडखोर आमदारांच्या निलंबनावर शिवसेना ठाम असल्याने या प्रकऱणातील कायदेशीर पेचही वाढला आहे. त्यामुळे शिंदे गटातर्फे भाजव व्यतिरिक्त पर्यायांची चाचपणी सुरू आहे. यातच एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना दुसऱ्यांना फोन केल्याचं समोर आलंय.

सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात तब्बल 40 आमदार आहेत. शिवसेनेच्या एकूण 54 आमदारांपैकी 40 आमदार शिंदे गटात गेल्याने शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *