‘जय महाराष्ट्र’ म्हणत संजय राऊतांचं ट्वीट ; पहा व्हिडीओ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२७ जून । शिवसेनेत आत्तापर्यंतचं ऐतिहासिक बंड झालं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी हे बंड पुकारलं असून शिवसेनेचे जवळपास सगळे मंत्री बंडात सामील झाले आहेत. आता फक्त आदित्य ठाकरेच राहिले आहेत. अशातच संजय राऊतांनी ट्वीट करत एक व्हिडीओ शेअर केला आहे. (Sanjay Raut Eknath shinde shivsena MLAs Gulabrao Patil)

आपल्या ट्वीटमध्ये संजय राऊतांनी (Sanjay Raut) शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांचा एक व्हिडीओ शेअऱ केला आहे. शिवसेनेत पुंगाणी वाजवणारे विजयराज शिंदे आमदार झाले, रिक्षा चालवणारे दीपकराव भोळे आमदार झाले, पानटपरी चालवणारा गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) तुमच्यासमोर मंत्री म्हणून बोलतोय, अरे हे सोडा, सायकल चोरणारे नारायण राणे मुख्यमंत्री झाले. असं या शिवसेनेचं आहे. रतनिया कहीं साप बदल लेते है, पुण्य की आड मे पाप बदल लेते है, मतलब के लिए कई लोग बाप बदल लेते हैं!, असं गुलाबराव पाटील या व्हिडीओमध्ये म्हणत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *