Low Sperm Count: पुरुषांनी वेळीच सावध व्हा ; स्पर्म्स काऊंट कमी होण्याची लक्षणं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२७ जून । आजकाल धकाधकीच्या जीवनशैली मुळे आणि इतर व्यसनामुळे मुळे पुरुषांमध्ये स्पर्म्सची संख्या कमी होण्याची समस्या भेडसावते. पुरुषांमध्ये स्पर्म्सची संख्या कमी असणं याला ‘ऑलिगोस्पर्मिया’ असं म्हणतात. ज्यावेळी स्पर्म्सची अजिबात निर्मिती होत नाही, तेव्हा त्याला अॅझोस्पर्मिया म्हणतात.

सीमनमध्ये प्रति मिलिलिटर 15 दशलक्ष स्पर्म्सपेक्षा कमी असल्यास, तुमच्या स्पर्म्सची संख्या सामान्यपेक्षा कमी मानली जाते. जर पुरुषामध्ये स्पर्म्सची संख्या कमी असेल तर गर्भधारणेची शक्यता खूप कमी होते.

लो स्पर्म काऊंटची लक्षणं
स्पर्म्सची संख्या कमी होण्याचं मुख्य लक्षण म्हणजे गर्भधारणा होण्यात अडचण. याशिवाय इतर कोणतीही चिन्हं किंवा लक्षणे दिसत नाहीत. काही पुरुषांमध्ये, स्पर्म्सची संख्या कमी होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. जसं की, हार्मोन्स बदलणं किंवा स्पर्म्सच्या मार्गात अडथळा येणं.

लो स्पर्म काऊंटची अजून काही दिसून येणारी लक्षणं
लैंगिक कार्यामध्ये समस्या जसं की, लैंगिक इच्छा कमी होणं
टेस्टिकल्स भागात वेदना, सूज आणि गाठी तयार होणं.
केस गळणं
क्रोमोसोम किंवा हार्मोन्सचं असंतुलन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *