कोरोनाचा वेग वाढला ; राज्यात एका दिवसात रूग्णसंख्या 6 हजारापार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२७ जून । महाराष्ट्रात कोरोनाचा वेग पुन्हा एकदा वाढलेला दिसून आला आहेआहे. काल राज्यात कोरोनाचे 6,493 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर शनिवारी 4,205 नवीन रुग्णांची नोंद झाली. याशिवाय 5 कोरोनाबाधित रुग्णांचाही मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात एक्टिव्ह रुग्णांची संख्या 24 हजारांच्या पुढे गेली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, 6213 बाधित लोकही कोरोनापासून बरे झाले आहेत.

पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय यांच्या अहवालानुसार, आज राज्यात B.A.4 चे 2 आणि B.A.5 चे तीन नवीन रुग्ण आढळले आहेत. नवीन व्हेरिएंटची लागण झालेले रुग्ण हे मुंबईतील रहिवासी आहेत. त्यांचे नमुने 10 ते 20 जून दरम्यान घेण्यात आले.

यामध्ये 0-18 वयोगटातील एक रुग्ण, 26-50 वयोगटातील तीन आणि 50 वर्षांवरील एका रुग्णाचा समावेश आहे. या पाच रुग्णांमध्ये तीन पुरुष आणि दोन महिला आहेत. आता राज्यातील B.A.4 आणि B.A.5 च्या एकूण रुग्णांची संख्या 54 झाली आहे. त्यापैकी 15 रुग्ण पुण्यातील, 33 रुग्ण मुंबईतील, 4 रुग्ण नागपूरचे आणि दोन रुग्ण ठाण्यातील आहेत.आता राज्यातील कोरोनाच्या एक्टिव्ह रुग्णांची संख्या 24,608 झाली आहे. सर्वाधिक एक्टिव्ह प्रकरणं मुंबईत 12,727 आणि त्यानंतर ठाण्यात 5,301 एक्टिव्ह प्रकरणं आहेत. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 97.83 टक्के आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 77,90,153 लोक कोरोनामधून बरे झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *