महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२७ जून । जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेत आणि नफेखोरांनी संधी साधल्याने मागील आठवडाभर सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाली होती. आज सोमवारी २७ जून रोजी दोन्ही धातू सावरले. आज सोनं २५० रुपयांनी आणि चांदी ६३० रुपयांनी महागले. जी-७ देशांची शिखर परिषद सुरु आहे. या परिषदेत काही देशांनी रशियातून सोने आयात करण्याबाबत नकार दिला आहे. सोने आयतीवर बंदी घातल्याने जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव वधारला असल्याचे कमॉडिटी विश्लेषकांनी सांगितले.
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर आज सोमवारी १० ग्रॅम सोन्याचा भाव ५०,८९२ रुपयांपर्यंत वाढला. त्यात २५७ रुपयांची वाढ झाली. चांदीच्या किंमतीत देखील आज वाढ झाली. एक किलो चांदीचा भाव ६१,०३८ रुपये इतका वाढला आहे. त्यात ६३० रुपयांची वाढ झाली.