महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२८ जून । देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार सुरु आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ११,७९३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २७ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ९,४८६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्या ९६,७०० वर पोहोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
रविवारी दिवसभरात १७ हजार ७३ हजार कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, २१ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान, १५ हजार २०८ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. सोमवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.५७ टक्के नोंदवण्यात आला होता. तर, दैनंदिन कोरोनासंसर्गदर ५.६२ टक्के आणि आठवड्याचा कोरोनासंसर्गदर ३.३९ टक्के नोंदवण्यात आला होता.
देशात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १९७ कोटी ३१ लाख ४३ हजार १९६ डोस देण्यात आले आहेत. यातील ३.६३ कोटी पहिले डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना देण्यात आले आहेत. खबरदारी म्हणून आतापर्यंत ४ कोटी ४१ लाख ५३ हजारांहून अधिक बूस्टर डोस देण्यात आले आहेत.