महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२९ जून । महाराष्ट्रातल्या राजकीय गोंधळाकडे देशभराचं लक्ष लागलेलं आहे. यातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी भाजपा कोट्यवधी रुपये खर्च करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (Mamata Banerjee on Maharashtra Political Crisis)
ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) म्हणाल्या की, महाराष्ट्रातलं सरकार (Mahavikas Aghadi government) पाडण्यासाठी भाजपा कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. राज्यातलं निवडून आलेलं सरकार पाडण्यासाठी एवढे पैसे त्यांच्याकडे कुठून येतायत? आपल्या देशातली लोकशाही कोणत्या दिशेने चाललीये. संसदीय संरचनेचं काय? भाजपाने सगळ्यावरच बुलडोझर चालवण्याचं ठरवलंय का?