मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी विवेक फणसाळकर यांच्याकडे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२९ जून । मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे उद्या (30 जून) निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी विवेक फणसाळकर नवे पोलीस आयुक्त असणार आहेत. विवेक फणसाळकर सध्या व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबई येथे कार्यरत आहेत. आता त्यांच्या खांद्यावर मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी असणार आहे. विवेक फणसाळकर 1989च्या बॅचेचे आयपीएस अधिकारी आहेत.

विवेक फणसाळकर यांची 31 मार्च 2018 रोजी ठाणे पोलीस आयुक्तलायात पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला होता. सुमारे पावणे दोन वर्ष त्यांनी ठाणे शहर आयुक्त पदाचा कार्यभार सांभळला. त्यानंतर त्यांना पदोन्नती देत त्यांची बदली करण्यात आली.

कोरोना काळात जीवाची बाजी लावून जनतेचा जीव वाचण्याऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. कर्तव्य बजावताना दुर्दैवी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना थेट नियुक्ती पत्र देण्याचा अभिनव उपक्रम त्यांनी राबविला होता. त्यांच्या या उपक्रमाचं राज्यभर कौतुक झालं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *