महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३० जून । महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा उलटफेर घडवून आणणाऱ्या आजच्या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती होणं म्हणजे अजून एका सातारकरांची मुख्यमत्रीपदी वर्णी लागली.. याचा मला आनंद आहे, असं शरद पवार म्हणाले.
श्री. एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल अशी सार्थ अपेक्षा व्यक्त करतो.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 30, 2022