महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३० जून । सत्तास्थापनेपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. सोबतच त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. तर औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्यासह बुधवारी मंत्रीमंडळात झालेले निर्णय कायदेशीर वैध नसल्याचं फडणवीस यांनी म्हंटले आहे. राज्यपालांनी बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घेता येत नसल्याच फडणवीस म्हणाले.
बुधवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याआधी उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळाची बैठक बोलावली होती. यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. यासोबत आणखी आठ प्रस्तावाला सुद्धा मान्यता देण्यात आली आहे. मात्र या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय बेकायदेशीर असल्याचं फडणवीस म्हणाले आहे. जेव्हा राज्यपाल बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश देतात तेव्हा बहुमत सिद्ध झाल्याशिवाय मंत्रीमंडळाची बैठक घेता येत नसल्याच फडणवीस म्हणाले. त्यामुळे ते निर्णय आम्ही पुन्हा घेऊ असे फडणवीस म्हणाले.