पोलीस कोठडीत आपल्याला अनेक गंभीर गोष्टींचा सामना करावा लागला ; केतकी चितळेचा गंभीर आरोप

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२ जुलै । राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टिपण्णी करणारी अभिनेत्री केतकी चितळे ही अटक होऊन जामीनावर सुटकाही झाली आहे. पण पोलीस कोठडीत आपल्याला अनेक गंभीर गोष्टींचा सामना करावा लागला असा आरोप तिनं नुकताच केला आहे. इंडिया टुडेशी बोलताना तिनं आपल्या मारहाण विनयभंग झाल्याचं म्हटलं आहे. (I was hit molested unlawfully jailed says Marathi actor Ketaki Chitale)

केतकी म्हणाली, तुरुंगात असताना मला मजबूत राहण गरजेचं होतं. कारण, एकतर मला बेकायदा पद्धतीनं माझ्या घरातून ताब्यात घेण्यात आलं. बेकायदापद्धतीनं कुठलंही वॉरंट, नोटीस न देता मला तुरुंगात डांबण्यात आलं. पण मला माहिती होतं की, मी काहीही चुकीचं केलेलं नाही त्यामुळं मी या सर्व गोष्टींना सामोर जाणार. पण पोलीस कोठडीदरम्यान, माझा विनयभंग झाला, मला मारहाण झाली. तसेच काही तरुणांनी माझ्या अंगावर विषारी काळा रंग टाकला. कळंबोली पोलिसांकडून ठाणे पोलिसांकडे सुपूर्द करत असताना हा प्रकार घडला.

केतकी चितळे २९ दिवस पोलीस कोठडीत होती. तिच्यावर राज्यात विविध पोलीस स्टेशनमध्ये २२ एफआयआर दाखल करण्यात आले होते. यांपैकी एका गुन्ह्यातून तिला जामीन मिळाला आहे, अद्याप इतर २१ गुन्हे कायम असल्याचं तिनं स्वतः यावेळी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *