महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२ जुलै । शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची तब्बल नऊ तासापासून ईडीकडून चौकशी सुरू होती. महाराष्ट्रातील राजकीय ड्रामा सुरू असतानाच राऊत यांना ईडीचं दुसरं समन्स आलं होतं. त्यांचा अलिबाग दौरा असल्याने चौकशीच्या समन्सला प्रत्युत्तर दिलं होतं. अखेर राज्यात नवं सरकार आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राऊत यांनी सक्तवसुली संचलनालयाच्या कार्यालयात हजेरी लावली. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांना नोटीसा पाठवल्या होत्या. (Sanjay Raut Latest News)
मी कपड्याची बॅग भरून आल्याचं राऊतांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. ही जमीन कुठे आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती नाही, असं ते म्हणाले. तब्बल ९ तासांपेक्षा जास्त वेळच्या चौकशीनंतर राऊत ईडी कार्यालयातून बाहेर आले. (Sanjay Raut ED Investigation)
तुम्ही तुमचं काम करा, मी सहकार्य करतो,असे राऊत म्हणाले.