महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ जुलै । मान्सुन शनिवारी संपुर्ण देशात पोहचला असून जुलै महिन्यात देशात सरासरीइतका तर राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा 45 टक्के अंदाज आहे. तसेच 6 जुलैपासुन राज्यात दमदार पाऊस रहाणार आहे. मात्र भारतीय महासागर द्वि-ध्रुविता(आयओडी) संपूर्ण पावसाळ्यात नकारत्मेकडे झेपावत आहे. पावसासाठी ही एक प्रतिकूलताही जाणवत आहे. त्यामुळे पावसाचे कमी प्रमाण आणि पावसाचा खंड जाणविण्याची शक्यता असल्याचे हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी अंदाज वर्तविला.
राज्यात शुक्रवारी आणि शनिवारी दिवसभरात ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळला.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्रनिर्मिती अपेक्षित असुन पावसासाठी पुन्हा एकदा पोषक वातावरण तयार होणार आहे. त्यामुळे सोमवारपासुन ते बुधवार पर्यंत मध्य महाराष्ट्र व विदर्भात दमदार पावसाचा अंदाज आहे.तर मुंबई, कोकण आणि गोवा राज्यात दमदार पाऊस सुरु आहे. तो कायम रहाणार आहे. तर मोसमी पावसाच्या ह्या एक अरबी समुद्रीय शाखेसाठी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाला उत्तम अनुकूलता आहे.
संपूर्ण मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, मोहोळ, माढा, बार्शी, करमाळा, कर्जत, जामखेड, पाथर्डी, पारनेर या सभोवताली सुरवातीला मात्र काहीसा विखुरलेल्या स्वरूपातच मध्यमच पावसाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात अपेक्षित कमी दाब क्षेत्रनिर्मिती मुळे देशात मान्सून(पूर्व-पश्चिम) ट्रफचे स्थापित झाला आहे. शनिवारी तो उत्तरेकडेच असुन सध्या तो राजस्थानच्या बिकानेर, अलवर तर उत्तरप्रदेश मधील हरडोई तसेच झारखंड मधील डालटणगांज आणि पश्चिम बंगालमधील शांतीनिकेतन मधून जात आहे.
सहा दिवस आधीच देश व्यापला
नैऋत्य मान्सुन हा 8 जूलै च्या दरम्यान संपुर्ण देशात दाखल होतो, मात्र यंदा मान्सुने सहा दिवस अगोदर म्हणजे 2 जुलै रोजीच संपुर्ण देश व्यापला आहे. तसेच मान्सून ट्रफ स्थापित केला आहे.