विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्हिप लागू होत नाही, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांचा दावा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ जुलै । विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी व्हिप लागू होत नसल्याचा दावा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर हेच विजयी होतील. ‘जावई’ विधानसभेचे अध्यक्ष होणार आहेत, असं म्हणत मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला. हे नवीन सरकार सेना भाजप युतीचं आहे. 165 ते 170 पेक्षा जास्त मतदान आमच्या बाजूने होईल असा विश्वास यावेळी मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. आजच्या दिवशी लोहशाहीचा विजय होईल असेही ते म्हणाले.

अध्यक्षपदाची निवडणूक ही सदस्यांनी करावी अशी तरतूद आहे. हे सदस्य लोकशाहीच्या मंदिरातील संरक्षक आहेत. त्यामुळं तुम्ही याच अध्यक्षांना मतदान करावं असा व्हिप काढण्याची कोणतीही तरतूद संविधानात नाही. म्हणून ओपन पद्धतीनं मतदान करणार आहोत असे ते म्हणाले. भाजपने हिंदुत्वाचा विचार असलेल्या शिवसेनेशी युती केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाने काढलेला व्हिप लागू होत नाही. राहुल नार्वेकर हे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. जावई जरी विधानसभेचे अध्यक्ष होत असले तरी ते सत्याच्या बाजूने उभे आहेत. युतीच्या बाजूने ते उभे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *