महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ जुलै । राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री छगन भुजबळ हे कोरोनामुक्त झाले आहेत. अजित पवार आणि छगन भुजबळ हे विधानमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनासाठी उपस्थित झाले आहेत. अजित पवार आणि छगन भुजबळ यांचा कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळं त्यांनी आज अधिवेशनात हजेरी लावली आहे. काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ आणि अजित पवारांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता, त्यामुळे ते आयसोलेशनमध्ये होते. अशातच शुक्रवारी चाचणी केली असता पुन्हा अजित पवारांची अहवाल पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळं ते अधिवेशनात येणार की नाही यावर प्रश्नचिन्ह होतं.
राज्यातील सत्तासंघर्षामध्ये महाविकास आघाडीला धक्क्यांवर धक्के मिळत आहेत. अशातच 3 आणि 4 जुलै रोजी विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनात नव्या सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. शपथ घेतली. पण शपथविधीवेळी फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती. पण येत्या अधिवेशनात नवनिर्वाचित सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.