महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ जुलै । एकनाथ शिंदे (eknath shinde) सरकार स्थापन झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Assembly Speaker Election ) आज होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि बंडखोर आमदार आमने सामने येणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आता विधानभवनातील शिवसेनेचे (shivsena) कार्यालय बंद करण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून महाविकास आघाडी सरकार पाडले. या बंडखोरी नाट्यानंतर पहिल्यांदाच शिवसेना आमदार आणि बंडखोर आमदार आमनेसामने येणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना विधिमंडळ पक्षाचे विधानभवनातील कार्यालय बंद करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटामध्ये सुरू असलेल्या मतभेदांमध्ये हे कार्यालय बंद करण्यात आलं आहे. ती कोणाच्या सांगण्यावरून बंद करण्यात आली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण, शिंदे गटाकडून कार्यालयावर ताबा मिळवण्याची शक्यता होती. त्यामुळे शिवसेनेनं हे कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला.