“ मैत्री आणि समाजसेवा” भक्ती शक्ती चौकात इनरव्हील क्लब ह्यांचे प्रतीक चिन्ह माननीय सूरजीत कौर ह्यांच्या हस्ते उभारले

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ जुलै । इनरव्हील क्लब ह्यांचे प्रतीक चिन्ह आज दिनांक ३जुलै २०२२ रोजी पिंपरी चिंचवड येथे भक्ती शक्ती चौकात ,इनर व्हील क्लबस् ऑफ इंडीयाच्या असोसिएशन प्रेसिडेंट माननीय सूरजीत कौर ह्यांच्या हस्ते उभारले गेले. ह्या प्रसंगी, २०२१-२२ च्या डिस्ट्रिरक्ट चैरमॉन संतोष सिंग, २०२२-२३ च्या डिस्ट्रिक्ट चैरमॉन मुक्ती पानसे, कौंसिल ऑफ प्रेसिडेंटस् ऐंड सेक्रेटरीस् (कोप्स) च्या संस्थापक स्मिता पिंगळे, रोटेरियन गुरदीप सिंघ, प्रेसिडेंट वैशाली जैन, अमरीता करिर , आरती ठक्कर , निर्मल कौर , कोप्स च्या संयोजीका बबिता कौशिक ,पास्ट डिस्ट्रिक्ट चेअरमन रेणू गुप्ता, मोहिनि राठी,सावित्री रघुपति, आशा देशपांडे, दिपशिखा पाठक व इनर व्हील च्या सदस्या उपस्थित होत्या.
इनर व्हील ही जागतीक पातळी वर महिलांची सर्वात मोठी समाजसेवा करणारी संस्था आहे.प्रत्येक क्लब ह्यांचे सभासद स्वतःच निधी जमा करून, विविध क्षेत्रात समाजकार्य करतात. पुणे कोप्स ही संस्था इनर व्हील ची अनौपचारीक पोटशाखा असून, पुणे शहर, पिंपरी चिंचवड, निगडी, तळेगाव दाभाडे व भोर ह्या परिसरांत स्थित क्लबस् ह्या संस्थेत सामील आहेत.
“ मैत्री आणि समाजसेवा” हे इनर व्हील चे बोधवाक्य आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *