विधानसभा अध्यक्षांमध्ये पहिले अध्यक्ष तर.. ; राहुल नार्वेकर तर दुसरे तरूण अध्यक्ष

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ जुलै । विधानसभा अध्यक्षपदासाठी ३ जुलै रोजी मतदान घेण्यात आले.  २८८ सदस्यांच्या सभागृहात एकाचे निधन झाले असल्याने संख्याबळ २८७ इतके आहे. अध्यक्षपदाच्या निवडीवेळी रविवारी समाजवादी पार्टीचे दोन आणि एमआयएमचे एक सदस्य तटस्थ राहिले. १२ आमदार अनुपस्थित होते. ॲड. नार्वेकर हे आजवरच्या विधानसभा अध्यक्षांमध्ये दुसरे तरुण अध्यक्ष आहेत. शिवराज पाटील चाकूरकर हे ४२ वर्षे सात महिन्यांचे असताना अध्यक्ष झाले होते. नार्वेकर यांचे वय ४५ वर्षे व पाच महिने इतके आहे. नार्वेकर मुंबईतील कुलाबा मतदारसंघाचे आमदार आहेत. नार्वेकरांच्या निवडीसाठीचा प्रस्ताव उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आवाजी मतदानाला टाकला.

मात्र, विरोधकांनी आक्षेप घेताच झिरवाळ यांनी प्रस्तावाच्या बाजूला कोण, विरोधात कोण आणि तटस्थ कोण अशी शिरगणतीचे आदेश दिले. नार्वेकर निवडून आल्याचे त्यांनी जाहीर करताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री जयंत पाटील, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे अजय चौधरी नार्वेकर यांना सन्मानाने आसनापर्यंत घेऊन गेले. राहुल नार्वेकर हे सर्वात तरूण अध्यक्ष असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह इतर भाजपा नेते म्हणाले. परंतु राहुल नार्वेकर हे दुसरे तरूण अध्यक्ष आहेत.

आजपर्यंत शपथ घेताना अध्यक्षांचे वय
वय अध्यक्ष
६४ सयाजी सिलम
४७ बाळासाहेब भारदे १
५२ बाळासाहेब भारदे २
५७ शेषराव वानखेडे
६७ बाळासाहेब देसाई
४२ शिवराज पाटील
५२ प्राणलाल व्होरा
५५ शरद दिघे
६० शंकरराव जगताप
७० मधुकरराव चौधरी
५९ दत्ताजी नलावडे
५७ अरुणलाल गुजराथी
६२ बाबासाहेब कुपेकर
५३ दिलीप वळसे
७० हरिभाऊ बागडे
५६ नाना पटोले
४५ राहुल नार्वेकर

 

सर्वांत तरुण अध्यक्ष

शिवराज पाटील (४२)
शपथ : १७ मार्च १९७८
जन्म : १२ ऑक्टो. १९३५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *