Konkan Rain Update : कोकणात मुसळधार पाऊस ; NDRFचं पथक चिपुळणात दाखल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुलै । रत्नागिरी (Ratnagiri Rain Update) जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलं आहे. तळकोकणासह रत्नागिरीच्या (Konkan Rain Update) बहुतांश तालुक्यात पावसाचा जोर पाहायला मिळाला आहे. तसंच पुढचे दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर दुसरीकडे मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात (Parshuram Ghat Land slide) दरड कोसळली आहे. त्यामुळे हा घाट 12 तासांपेक्षा अधिक काळ लोटला, तरी बंद आहे. परशुराम घाटात दरड कोसळण्याचा धोका असल्यानं वाहतुकीवर मर्यादा घालण्यात आल्या आहोत. त्याचा फटका मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीला बसलाय. तसंच सुरक्षेच्या कारणास्तव पुन्हा एकदा चिपळुणात एनडीआरएफचं पथ तैनात करण्यात आलं आहे. एनडीआरएफची टीम अलर्ट मोड असून खबरदारी घेण्यात येतेय. जाणून घेऊयात याच संदर्भातील चार मोठे अपडेट्स…

1 जगबुडी, काजळी नदी इशारा पातळीवर
मुसळधार पावसाने कोकणातील नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. तर जगबुडी नदीसह काजळी नदीने इशारा पातळीवर ओलांडली आहे. तसंच वशिष्ठी नदीसोबत इतर नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे नदीच्या किनारी भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

2 मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
रत्नागिरी जिल्ह्याला पुन्हा पुराचा धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. खेड नगरपरिषदेच्या भागात भोंगा वाजवून लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे कोल्हापुरातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे कोल्हापुरातील अनेक बंधारे पाण्याखाली गेलेत.

3 कोकणात धुव्वाधार
मंडणगडमधील विरसई बोडणीच्या नदीवर कॉजवेवर भगदाड पडलंय. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झालाय. तर सिंधुदुर्गातील कणकवली, देवगड, कुडाळ, वेंगुर्ला, वैभववाडी, दोडामार्ग तालुक्यात पावसाचा प्रचंड जोर सोमवारी पाहायला मिळालाय. येत्या 48 तासांत या भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *