महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जुलै । उद्धव ठाकरेंनी बोलावल्यास आम्ही नक्की जाऊ, मात्र त्यानी आजूबाजूच्या लोकांना बाहेर ठेवावं असं वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलंय.. सध्या आम्ही भाजपसोबत असल्यानं त्यांच्याशीही संवाद साधावा लागेल याची आठवण करुन द्यायला दीपक केसरकर विसरले नाहीत.. आज एकनाथ शिदे यांनी मंत्रालयातील कार्यालयात प्रवेश केला. यावेळी आयोजीत करण्यात आलेल्या पुजेसाठी दीपक केसरकर यांनी उपस्थिती लावली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.