महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जुलै । बंडखोर आमदारांच्या समर्थनासह एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत राज्यात सत्तास्थापना केली. ठाण्यात एकहाती वर्चस्व असलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. आता त्यांनी शिवसेनेला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असताना बुधवारी संध्याकाळी ठाणे पालिकेतील तब्बल ६६ माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे आता शिवसेनेचा केवळ एकच नगरसेवक ठाकरे गटात आहे. याच मुद्द्यावरून मनसेनेसंजय राऊत यांना चमत्कार बाबा म्हणत टोला लगावला.
'चमत्कार बाबा'संजय राऊत यांच्यामुळे ठाण्यात नवाब सेनेत एकच नगरसेवक राहिला😅
त्याला बहुतेक महापौर करणार आता पक्षप्रमुख …
सौ दाऊद,एक राऊत …😍— Gajanan Kale (@GajananKaleMNS) July 7, 2022