आमदार लक्ष्मण जगताप यांची मंत्रिमंडळात नियुक्ती करावी ; दिपक भोजने सामाजिक कार्यकर्ते यांची मागणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जुलै । पिंपरी (मोरवाडी):-आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी केलेल्या लोकाभिमुख कार्याचा गौरव म्हणून भाऊचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्री दिपक भोजने यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, यांना केली .

पिंपरी चिंचवड शहरात शून्यातून सुरूवात करून राजकारणात आपला वेगळा ठसा निर्माण करणारे सर्वसामान्यांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची भूमिका शिस्तबद्ध व नियोजनबद्ध कामकाजाची आखणी निर्णय घेण्याची क्षमता प्रशासनाला हातळ्याचे वकुब हे त्याच्या आत्तापर्यंतच्या कार्यशैलीतून उभ्या पिंपरी चिंचवड शहराने पाहिले आहे त्यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता दूरदृष्टी ठेवून चिंचवड मतदार संघाचा विकास तर केलाच त्यांनी आणलेल्या विविध लोकाभिमुख प्रकल्पाचा इतर मतदार संघात फायदा झाला चिंचवड मतदार संघ वेगवान कायापालट करून खरी विकासाची व्याख्या शहराला दाखवून दिली शहरात गोरगरीब जनतेसाठी महाआरोग्य शिबिरे घेऊन हजारो रूग्णांना योग्य उपचाराकरिता भरीव काम केले पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व सामान्यांचा अनधिकृत निवासी बांधकामास आकरला जाणारा शास्तीकर पुर्णपणे माफ करण्याची करण्याची लक्षवेधी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप काही वर्षांपूर्वी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मांडली होती प्रसंगी आपल्या आमदारकीची राजीनामाही दिला होता आमदार लक्ष्मणभाऊ यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते सध्या उपचार घेत आहेत नुकत्याच झालेल्या राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी रूग्णशय्येवर असतानाही आमदार लक्ष्मणभाऊ हे रुग्णवाहिकेतुन मुंबई कडे रवाना झाले होते पक्षाची बांधिलकी व आपले कर्तव्य म्हणून त्यांनी सलग दोनवेळा मतदानाचा हक्क बजावला व सर्वाची मने जिंकली यातुन त्याची आपल्या पक्षाची व समाजिक तळमळ दिसुन आली होती या विजयानंतर लढवय्ये आमदार म्हणून त्यांची ओळख झाली होती सध्या जरी त्यांची खालवली असली तरी ते त्यावर मात करून लोकसेवासाठी पुन्हा उभारी देतील असा विश्वास आम्हा पिंपरी-चिंचवडकरांना आहे नुकत्याच महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडल्या व शिंदे गटाचे नवीन सरकार भाजपाच्या सहकार्याने स्थापन झाले लवकरच राज्याच्या मंत्री मंडळाचा विस्तार होणार त्या मंत्रिमंडळात आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना मंत्रीपद देण्यात यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *