महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जुलै । शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. मंत्रिमंडळाचा विस्ताराचा फॉर्म्युला कोणता राहील व पहिल्या टप्प्यात किती जणांची वर्णी मंत्रिमंडळात लागेल, यावरच प्रामुख्याने चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस उद्या, शनिवारला दुपारी साडेचार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेणार आहेत.
गेल्या आठवड्यात शपथविधी पार पडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांची ही पहिलीच दिल्ली भेट आहे. पावणेआठ वाजता त्यांचे दिल्लीत आगमन झाल्यानंतर ते लगेच महाराष्ट्र सदनात दाखल झाले. पत्रकारांशी बोलल्यानंतर फडणवीस एकटेच निघून गेले. त्यानंतर काही वेळाने एकनाथ शिंदे निघाले. या नेत्यांनी अमित शहा व भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली.
गृह, महसूल भाजपकडेच?
तसेच मंत्रिमंडळाची खाते वाटपावरही चर्चा होणार आहे. यात गृह, महसूल, नगरविकास ही खाती भाजपकडे राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.