![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जुलै । नाश्त्याला चटपटीत समोसा हा अनेकांच्या आकडीचा पदाथ. सोबतीला आंबटगोड आणि तिखट चटणी असेल तर बात काही औरच. जर अर्ध्या तासात तुम्ही एक समोसा फस्त केला आणि त्याबदल्यात मिठाई विक्रेत्यानेच तुम्हाला 51 हजार रुपये दिले तर…अर्ध्या तासात फक्त एक समोसा फस्त करण्यात कसले आलेय चॅलेज असे सहाजिकच तुम्हाला वाटत असेल. पण जरा थांबा…हा काही साधासुधा समोसा नाही. मेरठच्या एका मिठाई विक्रेत्याने चक्क आठ किलोचा बाहुबली समोसा तयार केला आहे. हा समोसा अर्ध्या तासात संपवणाऱयाला त्याने 51 हजार रुपये रोख बक्षीस जाहीर केले आहे. आता आठ किलोचा समोसा म्हटलं तर त्याची किंमतही तशीच असणार.
साधारण एक समोसा ते 1100 रुपयांना विकतात. आजकर अनेक खवय्यांनी ही चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला परंतु कुणालाही समोशाचे हे चॅलेंज पूर्ण करता आले नाही.