महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुलै । बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता ऋतिक रोशनचे वडिल आणि निर्माते दिग्दर्शक राकेश रोशन यांचा वयाच्या अवघ्या 72 व्या वर्षीचा फिटनेस पाहून चाहत्यांनी तोंडात बोटं घातली आहेत. नुकताच ऋतिकने आपल्या वडिलांच्या वर्कआऊटचा एक एक व्हिडीओ शेअऱ केला आणि त्यांचा फिटनेस आणि वर्कआऊट चर्चेत आला. त्यांनी जिममध्ये केलेला वर्कआऊट पाहून चाहते खुश झाले आहेत.
राकेश रोशन 72 वर्षांचे आहेत. या वयातही आपला फिटनेस चांगला ठेवण्यासाठी ते जिममध्ये घाम गाळताना दिसत आहेत. तसेच भारी वजन उचलतानाही दिसत आहेत. ऋतिकने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन वडिलांचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राकेश रोशन जीममध्ये जबरदस्त वर्कआऊट करताना दिसत आहेत. तसेच त्यांनी जिम आऊटफिटमध्ये दिसत आहेत.
https://www.instagram.com/hrithikroshan/?utm_source=ig_embed&ig_rid=0b036265-06dd-48f9-b823-4baf812c0ff7