नेहरूनगर वासीयांसाठी नगरसेवक राहुल भोसले सरसावले ; नागरिकांची गैरसोय पाहता भाजी मंडई केली सुरू ! स्तुत्य उपक्रमावर कौतुकांचा वर्षाव!

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । पिंपरी- चिंचवड  । विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे ।  कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात सध्या 3 मे पर्यंत लॉक डाऊन घोषित केल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसाठी सर्वच नागरिकांची गैरसोय होत आहे… राज्यातील कोरोनाची हॉटस्फोट असलेली ठिकाणे तर थेट सील करण्यात आली आहेत. त्यातच पिंपरी मधील नेहरूनगरात भाजीची दुकाने बंद असल्यामुळे येथील परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन येथील नगरसेवक राहुल भोसले यांनी नेहरूनगर येथिल ध्यानचंद पाॅलीग्रास हाॅकी स्टेडियमच्या पार्किंगमध्ये भाजी मंडई सूरू केली आहे. राहुल भोसले यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातील नागरिकांमधून कौतुक होत आहे. 

या मंडईमध्ये 70 भाजीचे स्टॉल लावण्यात आले असून एकावेळी फक्त 10 ग्राहकच आत मध्ये प्रवेश करू शकतात. पूर्णपणे सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळले जात आहेत. 3 मे पर्यंत ही भाजी मंडई सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असून, भाजी खरेदी साठी येणाऱ्या ग्राहकांना सनेटिझर मारून त्यांचे तापमान तपासून आत सोडले जात आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त नेहरूनगरवासीयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक राहुल भोसले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *