गृहमंत्रीपदासाठी ‘या’ नेत्याचं नाव आघाडीवर ? शिंदे-शहा भेट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुलै । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सध्या दिल्लीच्या दौऱ्यात आहेत. या दोघांनी शुक्रवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. रात्री साडेनऊ वाजता सुरू झालेली ही बैठक रात्री उशिरा दोन वाजता संपली. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपासंदर्भात विस्तारानं चर्चा झाली. राज्याचे नवे गृहमंत्रीपद कुणाला मिळणार यावर देखील या भेटीत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गृहमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस नाही तर चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांचे नाव आघाडीवर आहे. यापूर्वी फडणवीस मुख्यमंत्री असताना गृहमंत्रीपद त्यांच्याकडेच होते. आता हे खातं फडणवीसांना न मिळता चंद्रकांत पाटील यांना मिळण्याची शक्यता आहे. गृह खात्यासह सहकार आणि अर्थ खात्यासाठी भाजपा आग्रही आहे. चंद्रकांत पाटील हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यास प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी नेत्याची नियुक्ती होऊ शकते. आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपा ओबीसी चेहरा पुढे करेल’ अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *