महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जुलै । येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. ओबीसी आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, अशी मागणी ओबीसी नेत्यांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी सुचक ट्वीट करत नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सल्ला दिला आहे. ‘ओबीसी आरक्षण देऊनच निवडणुका होतील, अशी खंबीर पावलं उचलावी’, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
“काही ठिकाणी नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत. नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि ओबीसी आरक्षण देऊनच निवडणुका होतील, अशी खंबीर पावलं उचलावी. सरकारकडून न्याय मिळेल हा विश्वास आहे”, असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.
काही ठिकाणी नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत… नवनिर्वाचित मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि ओबीसी आरक्षण देऊनच निवडणुका होतील अशी खंबीर पावलं उचलावी .. सरकार कडून न्याय मिळेल हा विश्वास आहे…@mieknathshinde @Dev_Fadnavis@CMOMaharashtra
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) July 8, 2022
ओबीसी आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात ओबीस वर्गाकडून आंदोलनेही करण्यात आली होती. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा मुद्दा चांगलाच गाजला होता. पावसाचे नियोजन करून येत्या आठ ते पंधरा दिवसात निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्याचे आदेश सर्वेच्च न्यायलयाने दिले आहेत. निवडणूक आयोगाने ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. येत्या ऑगस्टमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे.