भारत-पाकिस्तान सामन्याची 3 महिन्यांपूर्वीच सर्व तिकीट बुक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुलै । ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाला आता अवघे काही महिने उरले आहेत. ही स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. यावेळीही भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी म्हणजे 23 ऑक्टोबरला हा सामना होणार आहे. मात्र याच्या जवळपास सर्व तिकिटे तीन महिन्यांआधीच विकल्या गेली आहेत. आजपासूनच हा सामना हाऊसफुल्ल झाला आहे. टुरिझम ऑस्ट्रेलियाकडून ही माहिती समोर आली आहे.(ind vs pak Match tickets sold out in few minutes)

ऑस्ट्रेलियात T20 विश्वचषक 16 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे, तर भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचा अंतिम सामना 13 नोव्हेंबरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याच्या तिकिटांची मागणी सर्वाधिक आहे. याआधी आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातही सामना होणार आहे. आशिया चषक यावेळी श्रीलंकेत खेळवला जाणार आहे, त्याचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *