महाराष्ट्राची ही कन्या देशाचे प्रतिनिधित्व करते आहे.. ; संजय राऊतांनी शेअर केला व्हिडीओ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुलै । नेहमी ट्विट करत विरोधकांवर टीकास्त्र सोडणारे संजय राऊतांनी कोल्हापूरच्या विंबल्डन गर्लचे कौतुक करत राजकारण रोजचेच आहे… त्या पलीकडे देखील जग आहे… असे म्हटले आहे. राजकारण सोडून राऊतांनी ट्विट केल्यामुळे त्यांचे हे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे.(Maharashtra Politics is everyday Sanjay Raut)

एशियन टेनिस फेडरेशनतर्फे इंग्लंड येथे होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेसाठी कोल्हापूरची टेनिसपटू ऐश्वर्या जाधव हिची आशियाई संघात निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी निवड झालेली ऐश्वर्या जाधव हे देशातील एकमेव खेळाडू आहे. दिल्ली येथे झालेल्या वर्ल्ड ज्युनिअर टेनिस स्पर्धेतून या संघाची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये १४ वर्षांखालील गटात दोन मुले आणि दोन मुलींची निवड करण्यात आली आहे.

ऐश्वर्या ही कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनची खेळाडू आहे आणि छत्रपती शाहू विद्यालयाची ती विद्यार्थिनी आहे. तिला प्रशिक्षक अर्षद देसाई, मनाल देसाई आदींचे मार्गदर्शन आहे. विम्बल्डन स्पर्धेसाठी भारताच्या ऐश्वर्या जाधवसह अझुना इचीओका-जपान, झांगर नुरलानुल-कझाकिस्तान, सी हॅयुक चो-कोरीया यांचा समावेश करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *