सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर केसरकरांची प्रतिक्रिया ; आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अजेंडा पाळतो

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुलै । विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रेबाबात कोणताही निर्णय घेऊन नये असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले असल्याने शिंदे गटातील १६ आमदारांना दिलासा मिळाला आहे. शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल यांनी सरन्यायाधीशांकडे दाखल याचिकांवर सुनावणीसाठी विनंती केली असता हे आदेश देण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टाकडून हे निर्देश दिल्यानंतर बंडखोर आमदार दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ( Deepak Kesarkar News In Marathi )

दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत सुप्रीम कोर्टाच्या निर्देशावर भाष्य केलं आहे. केसरकर म्हणाले, ‘आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत. त्यात सर्व आमदारांना दिलासा मिळाला आहे. जोपर्यंत निकाल होत नाही, तोपर्यंत निलंबन नाही. हे योग्य आहे. कारण सर्व बाजू जाणून घेणे गरजेचे आहे. सुनील यांना मुख्य प्रतोद म्हणून नियुक्त करण्यात आले हे चुकीचे आहे’.

‘आमच्या बहुतांश मागण्या होत्या, त्या मान्य झाल्या आहेत. एकंदरित जे विषय होते, ते आपोआप सुटले आहेत. आता महाराष्ट्राचा गाडा सुरळीत चालवणे या दृष्टीकोनातून विचार करणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीमध्ये अध्यक्ष निवडणूक होऊ नये हे योग्य नाही. आता विधानपरिषद सभापतीची निवडणूक बाकी आहे. नंतर ती देखील होईल’, असे दिपक केसरकर म्हणाले.

‘आमची मूळ याचिका होती, त्यावर आज काहीही झालं नाही. ज्यावेळी कोर्ट आपल्या सवडीने करेल, तो निकाल सर्वांना बंधनकारक असेल. राज्यात मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल, हे नंतर ठरेल. सध्या महाराष्ट्रात कारभार सुरळीत चालला आहे’, असे केसरकर म्हणाले.

‘आम्ही अजूनही शिवसेनेचे सदस्य आहोत. आम्ही वचन पाळलं नाही, असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाटत आहे. पण आम्ही पक्षांचा अजेंडा बाळासाहेब ठाकरेंचा पाळतो. सध्या जो काही प्रकार चालला आहे, तो फार बरोबर नाही. सामान्य शिवसैनिकाला विचारा, मग तो सांगेल की, आमचं आयुष्य काँग्रेससोबत लढून गेलं नाही. आता त्यांच्यासोबत आपण आहोत. आता आम्ही भाजपसोबत आलो आहोत हे फार काही वेगळं झालेलं नाही. आमचा उठाव करण्यामागचा हाच विचार होता. भाजपसोबत जाणे आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार पुढे नेणे’ असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *