महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुलै । शिवसेनेच्या 40 हून अधिक आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी करून भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले. तब्बल 40 आमदार गेल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. त्यातच शिवसेनेचे खासदार देखील एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे वृत्त आले होते. मात्र शिवसेनेसोबत 19 पैकी 17 खासदार असल्याचं सांगण्यात समोर आलं आहे. त्यामुळे शिवसेनेला काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. (Shivsena MP news in Marathi)
मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीला पाच खासदारांनी दांडी मारली होती. यापैकी संजय जाधव वारीला गेलेले होते. ते आजारी आहेत. त्यामुळे ते येऊ शकले नाही. तर संजय मंडलिक यांना दिल्लीला जावं लागलं. त्यांनी परवानगी घेतली होती. तसेच खासदार कलाबेन डेलकर पावसामुळे येऊ शकल्या नाहीत. तर खासदार भावना गवळी आणि श्रीकांत शिंदे आले नाहीत. त्यामुळे शिवसेनेसोबत 19 पैकी 17 खासदार असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे उद्धव टाकरे यांनी खासदारांचं बंड थोपवल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा झाली. शिवसेनेच्या बहुतांशी खासदारांनी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासंदर्भात मत व्यक्त केल्याचं सांगण्यात आलं आहे.