पिंपरी चिंचवड ; ‘रंग पांडुरंग’ कार्यक्रमाला प्रतिसाद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जुलै । आषाढी एकादशी निमित्त ‘थिएटर वर्कशॉप कंपनी’ आयोजित ‘नादवेध’ प्रस्तुत ’रंग पांडुरंग’ या कार्यक्रमाला रसिकांची वाहवा मिळाली. सुरेल भक्ती गीतांसह सुश्राव्य अभंग असलेला हा कार्यक्रम चिंचवडच्या पैस रंगमंच येथे आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रम पिंपरी चिंचवडकरांसाठी निशुल्क असल्याने कार्यक्रमाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला. ‘जय जय राम कृष्ण हरी’ हा नाम घोष करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गायिका शर्मिला शिंदे व मंगलेश बुटे यांनी ‘अबीर गुलाल’,’नाम गाऊ नाम घेऊ’,’अवघे गरजे पंढरपूर’ अशा सुप्रसिद्ध रचना सादर करत रसिकांना भक्तीरसाचा अनुभव दिला. त्यानंतर ’अरे कृष्णा अरे कान्हा’ हे भारूड गायिका शर्मिला यांनी गात कार्यक्रमात रंगत आणली. एकापेक्षा एक अभंग भक्ती रचना गात गायकांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्य़ांना साथ निलेश शिंदे (तबला साथ), चंद्रकांत गोसावी( पखवाज साथ), गणेश गायकवाड(टाळसाथ) या कलाकारांनी केली .

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली. सर्व बालचमूंनी वारकरी वेषात दिंडीमध्ये सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे संयोजन बाळकृष्ण पवार, युसुफअली शेख, ऋतुजा दिवेकर, साक्षी धादमे, पवन परब यांनी केले. आभार प्रभाकर पवार यांनी मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *