महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जुलै । राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलं होते. १३ जुलै रोजी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मनसेचा मेळावा होता. परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तातडीचं पत्र काढत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. उद्या होणारा मेळावा पुढे ढकलण्यात आल्याची माहितीही राज यांनी कार्यकर्त्यांना पत्राद्वारे केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांठी मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांचे पत्र.#MNSAdhikrut pic.twitter.com/oDcj7AKehu
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 12, 2022