डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होतील ; ‘या’ गोष्टींचा असा करा वापर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जुलै । स्त्री असो किंवा पुरुष परंतु काळी वर्तुळे सौंदर्य कमी करतात. जेव्हा डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात तेव्हा एखादा व्यक्ती आजारी असल्यासारखे वाटते.जर तुमच्या डोळ्यांजवळ काळी वर्तुळे असतील, तर तुम्ही ती कमी करू शकता. तुम्ही तुमच्या घरात ठेवलेल्या काही गोष्टी वापरुनच काळी वर्तुळे 2 दिवसात हलकी होऊ शकतात. चला जाणून घेऊ या काळे वर्तुळ दूर करण्याचे घरगुती उपाय (Dark Circle Home Remedies).

डोळ्यांखालील काळी वर्तुळ कमी करण्यासाठी कोरफड किंवा ऍलोव्हेराचा वापर करा. एलोवेरा जेल एका भांड्यात ठेवा आणि कापसाच्या मदतीने ते डोळ्यांखाली लावा. फक्त आपल्या हातांनी त्यावर जास्त जोर टाकू नका, फक्त हालक्या हाताने जेल लावा. सुमारे 10-15 मिनिटांनंतर, ओल्या टॉवेलने किंवा ओल्या वाइपने हा जेल पुसून टाका. असे दिवसातून दोनदा करा आणि 2 दिवसात तुम्हाला लगेच फरक दिसेल.

हळद आणि ताक एकत्र करून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांवर लावा. पेस्ट सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा काळजीपूर्वक धुवा. 2 दिवसात काळी वर्तुळे दूर करण्यासाठी हा घरगुती उपाय दिवसातून दोनदा करा. यामुळे डोळ्यांखालील त्वचेला पोषण आणि आर्द्रता मिळते.

ग्रीन टी बॅग्ज – डार्क सर्कल दूर करण्यासाठी ग्रीन टी , सर्व प्रथम, एका पॅनमध्ये पाणी गरम करा आणि त्यात ग्रीन टी बॅग्ज भिजवा. काही वेळाने ग्रीन टी बॅग पाण्यातून काढून फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. नंतर या बॅग्ज थंड झाल्यावर थोडावेळ डोळ्यांवर ठेवा आणि थंडावा जाणवेल. यामुळे काळी वर्तुळे कमी होतात.

(टीप : इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणताही उपचार करण्यापूर्वी वैद्यांचा सल्ला घ्या. . आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *