महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जुलै । आज गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाठोपाठ शिवसेना खासदार संजय राऊतांनीही बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं आहे. त्यांनी ट्वीट करत एक फोटो शेअर केला आहे. (Sanjay Raut News)
आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, वोही गुरु…गुरुर भी वो ही! जय महाराष्ट्र. या ट्वीटसोबत संजय राऊतांनी बाळासाहेब ठाकरेंसोबतचा एक जुना फोटोदेखील शेअऱ केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बाळासाहेब ठाकरेंना गुरुस्थानी मानत अभिवादन केलं आहे. आपण बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणार नाही, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
वो ही 'गुरू'… 'गुरूर' भी वो ही!
जय महाराष्ट्र!! pic.twitter.com/KFSWxUlYvw— Sanjay Raut (@rautsanjay61) July 13, 2022