गायक दलेर मेहंदी यांना 2 वर्षांची शिक्षा, न्यायालयाच्या सुनावणीनंतर तातडीने अटक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जुलै । पतियाळा कोर्टाने गायक दलेर मेहंदी यांना 2 वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. 15 वर्षे जुन्या मानव तस्करी केसमध्ये त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आज पतियाळा कोर्टात (Singer Daler Mehndi sentenced to 2 years) सुनावणी झाली. या प्रकरणात सुनावणीदरम्यान कोर्टाने दलेर मेहंदी यांना दोषी करार दिला आहे. काही वेळानंतर शिक्षाही सुनावण्यात आली.

कोर्टाच्या निर्णयानंतर तातडीने दलेर मेहंदी यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 2003 मध्ये सदर पोलिसांनी बल बेडा गावात राहणारे बक्शीस सिंह हिच्या तक्रारीनंतर दलेर मेहंदीचे भाऊ शमशेर मेहंदी ध्यान सिंह आणि बुलबुल मेहताविरोधात परदेशात पाठवण्याच्या नावाखाली फसवणूक करीत 20 लाख रुपये घेतल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *