महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जुलै । राज्यात अजून पूर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधीही (Maharashtra Cabinet) झाला नाही, मात्र त्याआधीच किरीट सोमय्या यांच्या एका वक्तव्यावरून दोन्हीकडून ठिणग्या उडू लागलेत. किरीट सोमय्या उद्धव ठाकरे यांना माफिया म्हणाल्यामुळे आदेश शिवसेना आमदार आक्रमक झाले, तर आता दीपक केसरकरांच्या वक्तव्यावर किरीट सोमय्या यांनी मला कोणी तंबे देऊ शकत नाही म्हणत जोरदार पलटवार केला आहे. त्यामुळे आता सोमय्या यांच्यामुळे या शिंदे सरकार आणि भाजपच्या युतीत मिठाचा खड पडणार का? असा सवाल राजकारणात चर्चेत आहे. अगदी सुरुवातीपासूनच किरीट सोमय्या हे ठाकरेंवरती टीका करण्यात सर्वात पुढे राहिले आहेत.
आता तंबी कोणी कोणाला दिली हा विषय वेगळा आहे, मात्र एक गोष्ट निश्चित आहे की आम्ही त्या सगळ्यांच्या भावनांच्या आदर करतो, मात्र घोटाळेबाजांना आता सोडणार नाही. महाविकास आघाडीतील जे कोणी घोटाळेबाज असतील, त्या घोटाळ्यांची चौकशी आणि कारवाई लॉजिकल कन्क्लूजन पर्यंत जाणार असे, म्हणत सोमय्यांनी केसरकरांनाही बजावलं आहे.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्येजो घोटाळा झाला. तो घोटाळा होत असताना 2017 मध्ये मी त्याचा पाठपुरावा केला होता. यात संजय पांडे यांच्या कंपनीचा हात आहे. ज्या पद्धतीने फिक्सिंग करण्यात आलं, त्याचा पाठपुरावा मी केलेला आहे. महाराष्ट्रातील जनतेला मी वचन देतो की संजय पांडे असो की संजय राऊत असो दोघांना त्यांनी केलेल्या पापाची शिक्षा भोगावी लागणार आहे. काल संजय राऊत यांना मुंबईतील शिवडीच्या कोर्टात अखेर हजर व्हावं लागलं आणि जामिनावर बाहेर यावं लागलं. पुढच्या वेळी जामीन मिळणार की नाही याची शाश्वती नाही, संजय पांडे असो की संजय राऊत हे सांगतात येत नाही, असं सूचक विधान सोमय्यांनी यावेळी केलं आहे.
तसेच 2017 मध्ये यामध्ये मी उडी मारल्यानंतर सीबीआयने केस रजिस्टर केली होती, इंटरनल आयटी ऑडिट होतं, मात्र ज्याच्याकडे आयटी ऑडिट होतं त्याला हे कसं कळलं नाही? आणि ही कंपनी संजय पांडे यांची आहे, मग याचा अर्थ असा होतो की संजय पांडे यांची कंपनी या घोटाळ्यात सामील आहे, असा इशाराही सोमय्यांनी यावेळी पांडे यांनाही दिला आहे.