महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जुलै । राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपासा तासभर चर्चा झाली. या भेटीआधीच भाजप-मनसे युती, मुंबई महापालिका निवडणूक, अमित ठाकरे यांनी मंत्रिपद असे अनेक मुद्द्यांवर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र बैठकी नेमकं काय झाली याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
मनेसचे सध्याची तरी भूमिका ही एकला चलो रे ची आहे. भविष्यात काय होईल हे कुणी सांगू शकत नाही. जसं शरद पवारांनी महाविकास आघाडी बनवली ती अनपेक्षित होती. आताच्या राजकारणात काय होईल सांगू शकतं नाही, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.
आम्ही भाजपला जी मदत केली त्याचा मोबदला मिळावा अशी अपेक्षा नाही, राज ठाकरे यांचा तसा स्वभाव नाही. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे पूर्वीपासूनचे मित्र आहे. राज ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ही भेट घेतली, असं ते बाळा नांदगावकर म्हणाले.
मुंबई महापालिका भाजपसोबत जाणार का? या प्रश्नवर बोलाताना बाळा नांदगावकर म्हणाले की, महानगरपालिका निवडणुका अजून लांब आहेत. तसेच कधी होतील हेही माहित नाही. त्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. याशिवाय मनसे नेते अमित ठाकरे यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात होती. मात्र ही बातमी चुकीची असल्याचे स्वतः राज ठाकरे यांनी सांगितले आहे.