Gold Silver Rate Today | या आठवड्यात सोने इतक्या रुपयांनी घसरले, चांदीची पण उतरली , जाणून घ्या काय आहेत आजचे भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६  जुलै । या आठवड्यात स्थानिक वायदे बाजारात MCX वर सोन्याच्या किंमतीत (Gold Rate Today) 1/31 टक्क्यांची घसरण नोंद झाली आहे आणि सोने 50,107 रुपये स्तरावर बंद झाले आहे. गेल्या आठवड्यात हा भाव 50779 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आठवड्याचा विचार करता सोन्याच्या किंमतीत 672 रुपये प्रति ग्रॅम तर चांदीच्या दरात प्रति ग्रॅम 1544 रुपयांची घट झाली. डॉलर मजबूत होत असल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. या आठवड्यात सोन्याचा वायदे बाजारातील दर 49957 रुपयांच्या पातळीपर्यंत घसरला. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) सोने 1706.50 डॉलर प्रति औसच्या स्तरावर बंद झाले आहे. आठवडाभरात ते 1695 डॉलरच्या पातळीवर घसरले.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार(Good Return Website) मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,840 प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,600 रुपये आहे. पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा दर 50,870 रुपये आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,630 आहे. नागपूर मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 50,870 रुपये आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,630 आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 46,630 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 50,8700 रुपये आहे. 999 शुद्ध चांदी या आठवड्यात 54,767 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली, गेल्या आठवड्यात हाच भाव 56,427 रुपये प्रति किलो होता. या आठवड्यात चांदीच्या किंमतीत 1660 रुपये घसरण नोंदवण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *