पुणे-बंगळुरु हायवे ; चांदणी चौक ते वारजे पूलापर्यंत वाहनांच्या रांगा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६  जुलै । विकेंड असल्यानं घाटमाथा आणि ठिकठिकाणी वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गवर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पहायला मिळाली. सध्या पुण्यातील चांदणी चौक ते वारजे पूलापर्यंत वाहन्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. (Traffic jam on Pune Bangalore highway Queues of vehicles from Chandni Chowk to Warje Bridge)

शहरात सध्या पावसानं काहीशी विश्रांती घेतली असली तरी घाट, धरण परिसर आणि महाबळेश्वर इथं चांगला पाऊस सुरु आहे. त्यातच आज शनिवार आणि उद्या रविवार असल्यानं वर्षाविहारासाठी आणि विकेंड एन्जॉय करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडले आहेत. त्याचा परिणाम म्हणून आज सकाळपासून हायवेवर वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमध्ये अनेक ठिकाणी अँब्युलन्स देखील अडकून पडल्या होत्या. चांदणी चौक ते वारजे पूलापर्यंतच अंतर पार करायला तब्बल १ तास एवढा अवधी लागत आहे. मागील २ तासांपासून या टप्प्यात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *