आता शिंदेंकडून नामांतराची घोषणा ; औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६  जुलै । औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला होता. तो निर्णय शिंदे सरकारने रद्द केला होता. आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये पुन्हा एकदा औरंगाबादचं नाव संभाजीनगर, उस्मानाबादचं नाव धाराशीव आणि नवी मुंबई विमानतळाचे नाव दिबा पाटील यांचं नाव देण्यात आलं आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याचा निर्णय झाला आहे. त्याचबरोबर नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे नामकरण करण्याचा निर्णय झाला आहे. एमएमआरडीएला ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे तसंच पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटींच्या रकमेस शासन हमी देणार आहे, असंही शिंदे यांनी सांगितलं.

औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर कऱण्याचा निर्णय आधीच्या सरकारने घेतला होता. त्यांनी उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाबाबतही घेतला होता. पण सरकार अल्पमतात असल्यामुळे या निर्णयाला कुणी आव्हान दिले असते तर अडचणीचे ठरले असते म्हणून निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. आज आम्ही दिलेल्या शब्दांप्रमाणे तिन्ही निर्णय घेतले आहे, असं शिंदे यांनी सांगितलं.

तर, मावळत्या सरकारचे जबाबदारी झटकण्याचे निर्णय नाही तर उगवत्या सुर्याप्रमाणे जबाबदारी घेऊन निर्णय घेण्यात आले आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *