महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ जुलै । एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन होऊन 15 दिवस उलटले आहे पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. अखेरीस यावर खुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. मंत्रिमंडळ नसलं तरी कामं थांबलेली नाही. लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, विरोधकांना जे वाटत आहे, तसं काही नाही, असं शिंदे यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केलं.
‘संजय राऊत काय बोलतात आता मला त्यांच्यावर बोलण्याची गरज नाही. रोज सकाळी उठून तेच काम करत असतात. राज्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यासाठी आम्ही पाहणी करत आहोत. शेजारी राज्यांशी आम्ही बोलत आहोत. कुणी पुरात अडकू नये, याची खबरदारी घेण्यासाठी आम्ही काम करत आहोत. पेट्रोल-डिझेलचे दर आम्ही कमी केले आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना कर्ज सवलत दिली जाणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, त्यामध्ये कोणतीही अडचण नाही, असं शिंदे म्हणाले.
मंत्रिमंडळ नसलं तरी कामं थांबलेली नाही. लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, विरोधकांना जे वाटत आहे, तसं काही नाही. आम्ही काम करत आहोत, निर्णय घेत आहोत, लवकरच विस्तार होईल, असंही शिंदे यांनी सांगितलं.