Osmanabad: पावसाचं थैमान, पिकं पाण्याखाली; शेतकऱ्यांवर नुकसानीचे संकट

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जुलै । दुष्काळी जिल्ह्यांच्या यादीत उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव येते. दुष्काळाचे मुख्य कारण म्हणजे अनावृष्टी. कधीकधी एक वर्ष किंवा कित्येक वर्षे पाऊस पडत नाही. अशा परिस्थितीत शेतात बियाणे पेरण्यातही (kharif crop) काही अर्थ नसतो. सिंचनासाठी पाण्याअभावी शेतीची कल्पनाही करता येत नाही. पिण्याच्या पाण्याचे संकटही उद्भवते. अशी अवस्था जिल्ह्यातील शेतकर्‍याची (Farmer) असते. मात्र, यावेळी वेगळेच चित्र पहायला मिळत आहे, पावसा अभावी वाया जाणारी पिके यावर्षी अतिवृष्टीमुळे (Heavy rain in osmanabad) वाया जात आहेत.

जूनच्या अखेरीस उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. पहिलाच पाऊस जोरदार झाल्याने ओढे, नाले तुडुंब भरून वाहिले. जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी लगबगीने सोयाबीन पिकाची पेरणी केली. संपूर्ण पेरणी केल्यानंतर पिक उगवण स्थितीत असताना 15 दिवस पावसाने दांडी मारली, पेरणी केलेली उगवते की नाही? असा प्रश्न शेतकर्‍यांनी पडला होता. मात्र, गेल्या आठवड्यात पावसाने संपूर्ण जिल्ह्यात हजेरी लावल्याने शेतकरी थोडासा सुखावला होता. 8 जुलै पासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाने दिवसरात्र झिमझिम स्वरूपात हजेरी लावली. गेले आठ दिवस सूर्यदर्शन देखील झालेले नाही.

कोणत्याही पिकाच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो. सोयाबीन पिकाला सध्या सूर्यप्रकाशाची आवश्यकता आहे, परंतु ढग दाटून आल्यामुळे पिकांना गेले आठ दिवस सूर्यदर्शन घडलेले नाही. आठ दिवसांपासून सुरू झालेला पाऊस थांबत नसल्याने पिकांमध्ये पाण्याचे ढव साचत आहेत. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी पडणाऱ्या रिपरिप पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक सोयाबीन पिकात पाणी साचले आहे. त्यामुळे पिक वाया जाण्याचा धोका आणखी वाढला आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. पुढील होणार्‍या नुकसानाची नुकसानभरपाई मिळण्यासाठी पीक विमा भरण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे महेश तीर्थांकर यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *