‘बाळांचे लसीकरण टाळू नका’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ! आकाश शेळके ! सहाव्या, दहाव्या आणि चौदाव्या आठवड्यामध्‍ये नियोजित डीपीटी, पोलिओ, रोटाव्हायरस लस, न्यूमोकोकल कॉन्जुगेट लस अशा प्रमुख लसी महत्त्वाच्‍या आहेत. करोनाच्या संसर्गामुळे लहान बाळांचे लसीकरण लांबणीवर पडले आहे. त्यामुळे बाळाचा जन्म होतो त्याचवेळी प्रसूतीगृहांमध्ये आवश्यक त्या महत्त्वपूर्ण लसी बाळाला द्या, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. आरोग्याच्या मुद्द्यांवर काम करणाऱ्या आरोग्य संघटनाही करोनाच्या विषयावर प्राधान्याने काम करत आहेत. त्यामुळे सर्वाधिक मुलांचे लसीकरण होणार नाही किंवा अंशत: लसीकरण होऊ शकेल अशी स्थिती आहे. मात्र , लसीकरण अत्‍यंत महत्त्वाचे असून, करोनामुळे लागू असलेल्या लॉकडाउनमुळे लसीकरणास विलंब होऊ शकतो, याकडे बालरोगतज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. लसीकरणाच्‍या डोसला होणाऱ्या विलंबामुळे पुढील डोसच्‍या कालावधीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मुलांना आजार होण्‍याची शक्‍यता आहे, असे हे तज्ज्ञ म्हणतात.


जागतिक आरोग्‍य संघटनेच्‍या (डब्‍ल्‍यूएचओ) मते नंतरचे लसीकरण डोस व्‍यत्‍यय आलेल्‍या किंवा विलंब झालेल्‍या लसीकरणासाठी मान्‍यतेनुसार पुढे ढकलता येऊ शकतात, असे इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थचे प्रमुख डॉ. विजय येवले यांनी सांगितले. ‘करोनामुळे नवजात बालकांना प्रसूतीगृहामध्‍ये बीसीजी, ओपीव्‍ही ओ व हिपॅटायटिस-बी लस दिली जात आहे. त्याद्वारे लसीकरणाच्‍या सुरुवातीच्‍या टप्‍प्‍याची काळजी घेतली जात आहे. करोना कालावधीदरम्‍यान डब्‍ल्‍यूएचओ व इंडियन अॅकॅडमी ऑफ पेडिएट्रिशिएन्‍सने लसीकरणासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वेही दिली आहेत’, असे ते म्हणाले.
सहाव्या, दहाव्या आणि चौदाव्या आठवड्यामध्‍ये नियोजित डीपीटी, पोलिओ, रोटाव्हायरस लस, न्यूमोकोकल कॉन्जुगेट लस अशा प्रमुख लसी महत्त्वाच्‍या आहेत आणि त्या शक्‍यतो वेळेवर देणे गरजेचे आहे. त्‍याचप्रमाणे नव्‍या महिन्‍यामध्‍ये नियोजित गोवर लसही लवकरात लवकर देणे आवश्‍यक आहे. फ्लूवरील लस देण्‍याचाही सल्‍ला बालरोगतज्ज्ञांनी दिला आहे.

ही काळजी घ्या…

– बाळाच्या लसीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या पालकांनी संसर्ग टाळण्‍यासाठी स्‍वच्‍छताविषयक सवयींचे पालन करण्‍यासह पौष्टिक आहाराचे सेवन केले पाहिजे.

– बाळामध्‍ये फ्लूसारखी लक्षणे नसल्‍याची खात्री घ्‍या.

– बाळाची काळजी घेण्‍यासाठी फक्‍त एक काळजीवाहक ठेवा.

– रेबिज किंवा दुखापत झाल्‍यास धनुर्वात लस आवश्‍यक असते. ती देण्यास विलंब करू नका.

– संसर्गित किंवा विलग करून ठेवलेल्‍या मातांच्‍या मुलांचे लसीकरण मातांवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांच्‍या सल्‍ल्यानुसार करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Facebook
  • X (Twitter)
  • LinkedIn
  • Mix
  • More Networks
Copy link